निफाड पोलीस स्टेशन हद्दीत २३ मार्च २०२६ रोजी घडलेल्या खून प्रकरणाच्या तपासात स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे तपासाला मोठी गती मिळाली असून परिसरात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणात सनी गीताराम पवार, बापू भाऊसाहेब जेऊघाले, अंकुश लक्ष्मण भोसले, संदीप राजाराम जाधव आणि अविनाश संजय माळी यांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत पोलिसांना मोलाचे सहकार्य केले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढणे तसेच कॅनॉल आणि तलाव परिसरात शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढण्याचे कठीण काम त्यांनी निःस्वार्थपणे पार पाडले.

त्यांच्या या धाडसी कृतीमुळे तपास प्रक्रियेला गती मिळाली आणि गुन्ह्याच्या उकल करण्यात महत्त्वाची मदत झाली. त्यांच्या कार्याची दखल घेत निफाड पोलीस स्टेशनतर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक गणेशजी गुरव यांनी नागरिकांच्या धाडसाचे कौतुक करत, “अशा सजग आणि धाडसी नागरिकांमुळेच पोलीस दल अधिक सक्षम बनते,” असे मत व्यक्त केले.

सदर सत्कार कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस नाईक नितीन सांगळे, पोलीस हवालदार नितीन साळवे, कपालेश्वर ढिकले, महिला पोलीस नाईक मनीषा गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अरविंद ढवळे, धनंजय जाधव, राजेंद्र दरोडे, धनंजय बैरागी, विक्रम लहाने, विनोद जाधव आणि योगेश आव्हाड उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून सर्व सत्कारमूर्तींना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भविष्यातही नागरिकांचे असेच सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed