दैनिक दक्षवेध मुंबई प्रतिनिधी

मुंबई, (दि. 31) : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करत सरकारने 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे मंत्रालयीन आणि महत्त्वाच्या विभागांमध्ये नव्या नियुक्त्यांमुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

          धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे (IAS:RR:2005) यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करून त्यांची नियुक्ती आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग विभागात कार्यरत असताना मुंढे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. अनेक जिल्ह्यांतील शेकडो कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. ही कारवाई सुरू असतानाच त्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

अश्विनी भिडे, आय. ए. एस.

लोकेशचंद्र, आय. ए. एस.

विकासचंद्र रस्तोगी, आय. ए. एस.

विनिता सिंघल, आय. ए. एस.

परिमल सिंग, आय. ए. एस.

          दरम्यान, ज्येष्ठ आयएएस अधिकारी लोकेश चंद्र (IAS:RR:1993) यांची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. यापदावरून बदलून मुख्यमंत्री यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अश्विनी भिडे (IAS:RR:1995) यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यापदावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:1995) यांना अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई यापदावरून बदलून वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त विनिता वैद्य सिंघल (IAS:RR:1996), प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यापदावरून प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई यापदावर, परिमल सिंह (IAS:RR:2004) यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई यापदावरून सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई यापदावर, लहू माळी (IAS:SCS:2009) यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड मुंबई यापदावर, माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यापदावर, प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:2010) सह आयुक्त, राज्य कर, मुंबई यापदावरून आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यापदावर आणि पृथ्वीराज बी पी (IAS:RR:2014) अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यापदावरून महापालिका आयुक्त, वसई विरार महानगरपालिका, विरार यापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed