जालना (दि. ३०) महानगरपालिकेचा 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पातील आकडेवारीच्या बेरजेमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची चूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही बाब नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली.

 

एवढ्या मोठ्या आर्थिक दस्तऐवजात अशी गंभीर चूक कशी झाली, यावरून श्रीकांत पांगारकर सभागृहात आक्रमक झाले. या प्रकाराची माहिती इतर नगरसेवकांनाही समजल्यानंतर अनेकांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रात अशा प्रकारची चूक होणे म्हणजे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले. सभागृहात यावेळी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमता आणि पात्रतेवरही सवाल उपस्थित करण्यात आले.

 

इतक्या मोठ्या आर्थिक तरतुदींच्या दस्तऐवजात झालेल्या या चुकीमुळे प्रशासनाविषयी नगरसेवकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ही चूक होती की बनवाबनवी, खरेच टायपिंगची चूक होती की काही गोडबंगाल, उपस्थित सभागृह सदस्यांच्याच काय अधिकाऱ्यांच्या देखील लक्षात ही बाब येवू नये ही निश्चितच गंभीर बाब आहे, असा सूर निघत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed