(दि. ३०) जालना महानगरपालिका सभागृहात होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीदरम्यान पत्रकारांना प्रवेश देण्यात यावा अशी जोरदार मागणी नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले यांनी केली. या मागणीवरून ते सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.“महानगरपालिका म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती होऊ नये. जनतेला सभागृहातील घडामोडी समजल्या पाहिजेत, त्यासाठी पत्रकारांना प्रवेश मिळालाच पाहिजे, सभागृहात नगरसेवक कोणते प्रश्न मांडतात, कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि जनतेशी संबंधित मुद्द्यांवर काय भूमिका घेतली जाते”, हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत काठोठीवाले यांनी व्यक्त केले.या दरम्यान महानगरपालिकेत पत्रकार प्रवेशाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसून आले. यावेळी नगरसेवक अक्षय गोरट्याल यांनीही पत्रकारांसाठी सभागृहाच्या वरच्या भागात बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मत व्यक्त केले.मात्र, पत्रकारांना थेट सभागृहात प्रवेश मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा पुन्हा ठळकपणे मांडण्यात आला. पत्रकार हे लोकशाहीतील चौथा स्तंभ असतात. सभागृहातील घडामोडी, जनतेचे प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. त्यामुळे पत्रकारांना महानगरपालिका सभागृहात प्रवेश देण्यात यावा, अशी ठाम मागणी नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले यांनी केली. या मुद्द्यावरून काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचेही दिसून आले. Post Views: 7 Post navigationदैनिक दक्षवेध : दिनांक ३० मार्च २०२६ अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत 100 कोटींची चूक; नगरसेवक श्रीकांत पांगारकर सभागृहात आक्रमक